Smartphone Tips and Tricks : स्मार्टफोनमध्येच हिडन फोल्डर कसा तयार करायचा? जाणून घ्या सविस्तर..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Smartphone Tips and Tricks : आजकाल सर्वांकडे स्वतःचा स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेकांच्या महत्त्वाच्या फाईल्स,फोटो किंवा महत्त्वाची कागदपत्रे असतात. काहीवेळा आपला स्मार्टफोन चोरीला जातो तेव्हा आपल्या याच कागदपत्रांचा चुकीचा वापर होण्याची दाट शक्यता असते.

जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुमची ही कागदपत्रे एका हिडन फोल्डरमध्ये असतील तर ती सुरक्षित राहतील, अन्यथा त्याचा चुकीचा वापर होऊ शकतो. तुमच्या स्मार्टफोनमध्ये अजूनही हिडन फोल्डर नसेल तर सोप्या पद्धतीने तो तयार करता येतो.

या फोल्डरमध्ये तुम्ही तुमचे फोटो, व्हिडिओ किंवा इतर माहिती लपवू शकता. त्याचबरोबर या फोल्डरमध्ये तुम्ही तुमचे अॅप्सही लपवू शकता. हे फोल्डर तयार कसे करायचे ते सोप्या स्टेप्समधून जाणून घेऊयात.

या स्टेप्स फॉलो करा

  1. तुमच्या स्मार्टफोनमध्ये फाइल मॅनेजर डाउनलोड करा. त्याशिवाय तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा इन-बिल्ट फाइल एक्सप्लोररचा वापरही करू शकता यामुळे तुम्हाला नवीन फाइल्स आणि फोल्डर्स तयार करता येईल. तुम्हाला सॉलिड एक्सप्लोरर फाइल मॅनेजरही वापरता येईल.
  2. एक नवा फोल्डर तयार करण्यासाठी तुम्ही फाइल एक्सप्लोररचा वापर करू शकता. हे डायरेक्ट इंटर्नल स्टोरेज किंवा इतर कोणत्याही फोल्डरमध्ये असण्याची शक्यता आहे
  3. त्यानंतर तुमचे नवीन फोल्डर तयार होईल. त्यानंतर तुम्हाला या फोल्डरमध्ये एक नवीन फाइल तयार करावी लागेल. जर तुम्हाला फाइल एक्सप्लोरर अॅपमध्ये फाइल प्रकार निवड असे सांगितले तर रिक्त फाइल निवडा. तुमच्या फाइलसाठी नाव तयार करा असे सांगितले जाईल. तेव्हा या मजकूर फील्डमध्ये, नाव ‘.nomedia’ वर सेट करा
  4. जर तुमचा नवीन फोल्डर तयार झाला तर तुम्हाला या या फोल्डरमध्ये कोणताही फोटो,व्हिडिओ किंवा कागदपत्र लपवून ठेवता येईल. हे लक्षात घ्या की हा मीडिया तुम्हाला इतर कोणत्याही अॅपमध्ये दिसणार नाही.