घरबसल्या पैसे कसे कमवायचे ? how to earn money online in marathi

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

वाचंकानो नोकरीच्या शोधात अपयश आल्यास अनेकांना नैराश्य येतं. तर अनेकदा घरबसल्या कंटाळा येतो. मात्र तुम्ही घरबसल्या देखील पैसे कमवू शकता. असे अनेक पर्याय आणि संधी आता उपलब्ध आहेत कि ज्याच्या माध्यमातून तुम्ही आर्थिक दृष्ट्या समृद्ध होवू शकता. (how to earn money online in marathi)

आजच्या घडीला स्पर्धा खूप वाढली आहे त्यामुळे आजच्या काळात करीअर आणि आयुष्याच्या घौडदौडीत पुढे जाण्यासाठी स्पर्धक काहीही करण्यास तयार होतात. आजच्या जगात पैसे कमवण्यासाठी आपण अभ्यासापेक्षा कोणत्या क्षेत्रात कुशल आहे हे पाहिले जात आहे.

या कारणांमुळे सोशल मीडिया चा प्रयॊग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जर तुमच्याअंगी संवाद कौश्यल आहे आणि एखादया विषयाचे मत अचूकरित्या मांडू शकत असाल तर आपल्यासाठी युट्यूब हा एक करिअर म्हणून उत्तम पर्याय आहे.

आज आम्ही ह्या पोस्ट मध्ये हेच सांगणार आहोत कि तुम्ही तुमचे विडिओ युट्युब वर अपलोड करून पैसे कसे कमवू शकता. यात सर्वात महत्वाची गोष्ट हि आहे कि युट्युब वर करिअर बनवण्यासाठी तुम्हाला जास्त भांडवल लावण्याची गरज नाही.

१) युट्युब चॅनेल बनवा:

आपले युट्युब चॅनेल हि आपली युट्युब वरील उपस्थिती असते. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हला तुमचे युट्युब चॅनेल बनवावे लागेल. तुम्ही तुमचे Gmail अकाउंट वापरून युट्युब अकाउंट ओपन करू शकता.

युट्युब अकाउंट बनवल्यानंतर तुम्हाला चॅनेल बानवावे लागेल चॅनेल ला नाव देताना चॅनेलचे नाव हे विषयाशी निगडित आणि इतरांपेक्षा वेगळे असले पाहिजे जेणेकरून चॅनेलचे नाव लोकांच्या सहज लक्षात येईल.

२) कन्टेन्ट अपलोड करा:

युट्युब चॅनेल सुरु करण्याअगोदर आपण कोणत्या क्षेत्रात व्हिडिओ तयार करू इच्छित आहात हे निश्चित करा, त्यानुसार चांगल्या क्वालिटी चे व्हिडिओ अपलोड करने गरजेचे आहे, श्रोत्यांनी आपली वाट पाहायला हवी असा कन्टेन्ट देण्याचे नियोजन केले पाहिजे.

सध्या युट्युब वर हजारो चॅनेल आहेत, मात्र सर्वच कमाई करत नाहीत. कारण त्यांच्याकडे कन्टेन्ट चांगला नाही परंतु आपण हि चूक करू नये, आपल्या यूजरना चांगला कन्टेन्ट दाखवण्याचा प्रयत्न करा. बाकीच्या चॅनेलपेक्षा आपला कन्टेन्ट हटके असावा, जो कि लोकांना आवडेल आणि त्यांच्यासाठी फायद्याचा ठरेल. आपल्याकडील जेवढी सब्सक्रायबरची संख्या जास्त तेवढा आपण चांगला व्यवसाय करू शकाल, त्यामुळे या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.

३) सब्सक्राईबर वाढवा:

युट्युब वरून पैसा हा जाहिरातीद्वारे मिळतो, त्यामुळे ती जाहिरात जास्तीत जास्त लोकांनी पाहिली पाहिजे. त्यासाठी आपल्या चॅनेलचे सब्सक्राईबर आणि व्हियुज वाढवावे लागतील. युट्युब चे व्हियुज वाढवण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाचाही वापर करू शकता,

तुम्ही तुमचे विडिओ फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वर शेअर करू शकता, जर तुमचे विडिओ चांगले असतील तर नक्कीच त्यामुळे सब्सक्राईबर वाढण्यास हि मदत होईल, आणि अश्याप्रकारचे विडिओ बनवण्याचं प्र्यत्न करा कि जे वायरल होऊ शकतील, जे लोकांना जास्त आवडतील.

एकदा चॅनेल सुरू केले की आपण पैसे कमावण्यासाठी रेडी झालो असे समजा. आपल्याला तिथे AdSense नावाचे एक ऑप्शन दिसते. हे ऍडसेन्स अप्रुव्हल मिळवणे फार सोपे आहे. ऍडसेन्स कशा प्रकारे काम करते ते आपण पुढे पाहूया… आणि आता पैसे कसे मिळवायचे याची स्टेप बाय स्टेप माहिती घेऊया…

1. गुगल ऍडसेन्स

आपल्या चॅनेलवर एकदा हे गुगल ऍडसेन्स लागू झाले की त्याचा वापर पैसे कमावण्यासाठी करता येतो. हे ऍडसेन्स आपोआप व्हिडीओ वर जाहिरातींच्या लिंक देण्यास सुरुवात करते. एखाद्या दर्शकाने त्या लिंक वर क्लिक केले की ठराविक पैसे तुमच्या अकाउंट मध्ये जमा होतात. म्हणजे जेवढे जास्त दर्शक तेवढीच क्लिक करण्याची जास्त शक्यता असते.

2. स्पॉन्सर्ड व्हिडीओ

हा पैसे कमावण्याचा दुसरा मार्ग आहे. एकदा का तुमचे चॅनल पॉप्युलर झाले की हा मार्ग वापरता येतो. सबस्क्राईबर आणि दर्शक संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर आपल्या चॅनेल कडे बड्या बड्या कंपन्यांचे लक्ष वेधले जाते. त्या स्वतःहून आमच्या जाहिराती तुमच्या व्हिडिओवर घ्या असे म्हणत तुमच्याकडे येऊ लागतात. या जाहिराती तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला किंवा शेवटी दाखवू शकता आणि बदल्यात मस्तपैकी रक्कम कंपन्यांकडून घेऊ शकता.

3. प्रॉडक्ट मार्केटिंग

हा तिसरा प्रकार. यात तुम्ही एखाद्या कंपनीचे प्रॉडक्ट किती चांगले आहे याची जाहिरात तुमच्या व्हिडीओ मध्ये करू शकता किंवा पूर्ण व्हिडीओ जाहिरातीचा बनवू शकता. सगळ्यात शेवटी ते प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी लिंक देऊ शकता. जर तुम्ही केलेली जाहिरात आकर्षक असेल तर दर्शक अर्थातच लिंक वर क्लिक करतील आणि मोबदल्यात तुम्हाला चांगले कमिशन मिळेल.

अश्या पद्धतीने अगदी सोप्या उपायांनी युट्युबवर पैसे कमावता येतात. या प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारचे व्हिडीओ फॉरमॅट चालत असल्याने तुम्ही डिजिटल कॅमेरा, मोबाईल कॅमेरा, प्रोफेशनल कॅमेरा अश्या कोणत्याही कॅमेरामधून शूट केलेले व्हिडीओ इथे अपलोड करू शकता.

आता काही महत्वाच्या संज्ञा 

1. CPM : Cost per thousand ads impression. पैसे अकाउंट मध्ये जमा होण्याचा हा एक टप्पा असतो. एखाद्या व्हिडीओ वर हजार जाहिराती आल्या की त्या हिशोबाने पैसे जमा केले जातात. CPM वाढवण्यासाठी वय, वेळ, लिंग, कंटेंट या गोष्टींचा योग्य ताळमेळ राखणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, सुट्टीच्या दिवशी CPM जास्त येतो. इंग्लिश बोलणाऱ्या देशांमध्ये CPM चा दर जास्त आहे.

2. RPM : Revenue per thousand views. हजार वेळा दर्शकांनी एखादा व्हिडीओ बघितला तर त्यातून किती कमाई झाली याचा हिशोब म्हणजे RPM. तर या कमाईतला 45% हिस्सा हा युट्युबच्या मालकीचा असतो. युट्युबला यातूनच रेव्हेन्यू मिळत असतो.

 

या गोष्टी वाचून जर तुम्हाला वाटत असेल की हे फारच सोपे आहे तर थांबा! इथे केला व्हिडीओ अपलोड आणि मिळाले पैसे असं नसतं. अनेकजण स्वतःचे चॅनेल सुरू करतात पण त्यातले मोजकेच लोक यशस्वी होतात कारण त्यांनी युट्युबचे नियम पाळले असतात. कुठला व्हिडीओ लोकांना आवडेल आणि कुठला नाही याचाही अभ्यास करावा लागतो. आता पाहूया अधिकाधिक पैसे मिळावे म्हणून काय करावे आणि काय नाही…

अहमदनगर लाईव्ह 24