अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- आता प्रत्येक जण ATM कार्ड वापरतो. ATM कार्डमुळे रोख पैसे सोबत नेण्याची आवश्यकता भासत नाही. आपण ज्या ATM मशिनमधून पैसे काढतो तसे मशिन्स आपल्याला अनेक ठिकाणी दिसतील.
ATM मशीन बनविल्यापासून आणि वापरल्यापासून प्रत्येक काम सोपे झाले आहे. आज एटीएम मशीनची आवश्यकता आहे आणि त्याचा वापर झपाट्याने वाढत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रत्येक भागात आपले एटीएम उघडलेत, जेणेकरून ग्राहकांना सेवा देताना कोणतीही अडचण येऊ नये.
तुम्हाला देखील तुमच्या दुकानावर किंवा जमिनीवर एटीएम बसवायचे असेल, तर तुमची जमीन एटीएमसाठी भाड्याने देता येईल. यामधून कसे पैसे कमवायचे हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत.
SBI ATM कसे लावायचे? – जर तुम्हाला एसबीआय एटीएम बसवायचे असेल तर तुम्हाला आधी बँकेशी संपर्क साधावा लागेल. बँकेने सांगितलेल्या नियमांनुसार, एटीएम बसवण्याचा अर्ज तुमच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एसबीआय प्रादेशिक व्यवसाय कार्यालयाला (RBO) द्यावा लागेल.
बँक म्हणते, ‘तुम्ही तुमच्या क्षेत्राच्या RBO चा पत्ता https://bank.sbi/portal/web/home/branch-locator वरून मिळवू शकता. पत्ता आमच्या जवळच्या शाखेतूनही मिळवता येतो. हे त्या RBO अंतर्गत काम करणाऱ्या सर्व शाखांच्या बँकिंग हॉलमध्ये प्रदर्शित केले जाते.
एटीएम कसे बसवायचे? – जर तुम्हाला देखील ATM मधून पैसे कमवायचे असतील तर तुमच्याकडे एक जागा असणे आवश्यक आहे. जमीन अशी असावी की, जिथे एटीएम सेटअप करता येईल. ही जागा दुकानासारखीही असू शकते, पण दुकान एटीएमनुसार थोडे मोठे असले पाहिजे.
बँकेशी थेट संपर्क करण्याव्यतिरिक्त, अनेक एजन्सीज एटीएम बसवण्याचे कामही करतात, ज्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. या एजन्सीजमध्ये टाटा इंडिकॅश एटीएम, मुथूट एटीएम, इंडिया वन एटीएम अशी अनेक नावे आहेत.
यातून पैसे कसे मिळतात ? – एटीएम लावून पैसे कमवण्याचे दोन मार्ग आहेत. प्रथम म्हणजे तुम्हाला मासिक आधारावर भाडे दिले जाते. दुसरा मार्ग म्हणजे कंपन्या व्यवहाराच्या आधारावर करार करतात. त्या एटीएममध्ये जेवढे जास्त व्यवहार होतील तेवढा नफा मालकाला मिळेल.