रुग्णसंख्येत काहीशी घट मात्र संसर्गाचा धोका अजून संपलेला नाही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- करोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी सर्वच घटकांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे शनिवार-रविवारी सुद्धा सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याबाबत तालुका यंत्रणांनी काळजी घ्यावी.

त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी अशा गर्दी होणार्‍या ठिकाणी कारवाई करावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केल्या आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून करोना उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी ते म्हणाले जिल्ह्यात लागू कऱण्यात आलेले प्रतिबंधात्मक नियम सर्वांसाठी लागू आहेत. त्यामुळे या नियमांचे नागरिकांनी पालन करावे आणि कोठेही गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

सध्या जरी रुग्णसंख्येत काहीशी घट दिसून येत असली तरी संसर्गाचा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करावे.

तालुकास्तरीय यंत्रणांनीही या नियमांचे पालन करीत नसलेल्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले.

ब्रेक दी चेन अंतर्गत यापूर्वी ज्या घटकांना ठरवून दिलेल्या वेळेत व्यवहार सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्या व्यतिरिक्त कोणत्याही नव्या सवलती प्रशासनाने दिलेल्या नाहीत.

त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. नागरिकांनीही कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24