सहावर्षांपूर्वी दिल्या पोलिसांच्या हातावर तुरी मात्र ….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- तब्बल सहा वर्षापूर्वी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या दोघा अट्टल दरोडेखोरांना श्रीगोंदा पोलिसांनी अखेर नुकतेच शेडगाव तसेच जवळा येथे जेरबंद केले.

संतोष ऊर्फ वंट्या दिलीप काळे आणि राहुल भारत चव्हाण (रा.जवळा ता.जामखेड) असे त्या दोघांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील रंजना मारुती भदे या महिलेच्या घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून ११ हजारांचा ऐवज लंपास केला होता.

या गुन्ह्यातील आरोपी असलेला संतोष काळे हा जामखेड तालुक्यातील जवळा येथील रहिवासी आहे. मात्र तो कर्जत तालुक्यात चोऱ्या करीत होता.

त्याच्यावर लोणी काळभोर, उरुळी कांचन, श्रीगोंदा, जामखेड पोलिस स्टेशनमध्ये मोक्का सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

तर राहुल भारत चव्हाण याच्यावर देखील बारामती व श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. या दोघांबाबत पोलिस निरीक्षक रामराव ढिकले

यांना माहिती मिळताच त्यांनी पथकाला याबाबत माहिती देत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार या पथकाने वरील दोघांनाना जेरबंद केले

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24