Gold Price Update : लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. कारण पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढल्याचे पाहायला मिळत आहेत.
सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा आतापर्यंतचा विक्रमी आकडा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक ताण आला आहे.
आज जाहीर होणार दर
आजपासून नवीन व्यावसायिक सप्ताहाला सुरुवात होणार आहे. परंतु, शेवटच्या व्यापारी आठवड्यात सराफा बाजारात फक्त सोने नाही तर चांदीच्या दरातही वाढ झाली होती. त्यामुळे आजभारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीची वाटचाल कशी होते याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
शुक्रवारी असे होते दर
शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात कमालीची उसळी पाहायला मिळाली. शुक्रवारी सोने प्रति 10 ग्रॅम 365 रुपये, तर चांदी 152 रुपयांनी महाग झाली.
शुक्रवारी सोने प्रति 10 ग्रॅम 365 रुपयांनी महागले आणि 56462 रुपये प्रति किलोवर बंद झाले. तर गुरुवारी सोने 18 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या उसळीसह 56097 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाल्याचे पाहायला मिळाले.
शुक्रवारी सोन्यासोबतच चांदीच्या दरातही वाढझाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी चांदी 152 रुपयांनी महाग होऊन 68115 रुपये प्रति किलोवर बंद झाली. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा दर 400 रुपयांनी वधारून 67963 रुपये प्रति किलोवर बंद झाला.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
शुक्रवारी 24 कॅरेट सोने 365 रुपयांनी महाग होऊन 56,462 रुपये, 23 कॅरेट सोने 364 रुपयांनी महाग होऊन 56236 रुपये, 22 कॅरेट सोने 334 रुपयांनी 51719 रुपये, 18 कॅरेट सोने 274 रुपयांनी महाग होऊन 42347 रुपयांवर आणि 14 कॅरेट सोने 213 रुपयांनी महागले आणि 33030 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
सोने महाग तर चांदी स्वस्त ?
सोने 203 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले आहे. सोन्याने या अगोदर म्हणजेच 9 जानेवारी 2022 रोजी सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्या दिवशी सोन्याचा भाव 56259 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. तर चांदी अजूनही त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा 11865 रुपये प्रति किलो दराने स्वस्त आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो आहे.
आणखी महाग होणार सोने?
देशात पुन्हा एकदा लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काळातही सोने आणि चांदीचे दर जास्त राहणार आहे. 2023 मध्ये सोन्याचे भाव जास्तच राहतील, असे सराफा बाजारातील जाणकारांचे मत आहे.