अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- अहमदनगर डिस्ट्रिक्ट को ऑपरेटिव्ह बँक्स एम्प्लॉईज युनियन व दि अंबिका महिला को ऑपरेटिव्ह बँक लि. अहमदनगर यांच्यात नुकताच कर्मचारी वेतन वाढीचा करार संपन्न झाला.
युनियन तर्फे करारावर कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे, जॉईंट सेक्रेटरी नितीन भंडारी व खजिनदार एम.वाय. कुलकर्णी यांनी तर बँकेतर्फे चेअरमन सुमन गोसावी, व्हाईस चेअरमन शांता मोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश गायकवाड यांनी सह्या केल्या आहेत.
समेट कर्ता म्हणून असिस्टंट लेबर कमिशनर सी.ए. राऊत यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. सदर करार हा दि.1 जुलै 2020 पासुन पुढे पाच वर्षांकरीता असेल. त्यामुळे कर्मचार्यांना फरकाची रक्कम लगेचच वितरित कऱण्यात येणार आहे.
करारान्वये कर्मचार्यांना दोन क्रमिक पगारवाढ, महागाई भत्यात वाढ, मेडिकल भत्ता, मेडिकल इन्शुरन्स, घरभाडे भत्ता, ओव्हर टाइम,
बोनस, व्यवसाय वृद्धी भत्ता इत्यादी सुविधा कर्मचार्यांना मिळणार आहेत. नवीन कारारान्वये होत असलेल्या पगारवाढीमुळे कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.