अहमदनगर Live24 टीम, 05 मे 2022 Chemical Fertilizer :- भारतीय शेतीत गेल्या अनेक वर्षांपासून उत्पादनवाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) वापर सुरू केला आहे.
सुरुवातीच्या काळात शेतकरी बांधवांना (Farmer) रासायनिक खतांच्या वापरामुळे फायदा देखील मिळाला. उत्पादन वाढीच्या अनुषंगाने केलेला हा प्रयोग सुरुवातीला 100% खरा उतरला.
मात्र काळाच्या ओघात उत्पादनवाढीसाठी केलेला हा प्रयोग उत्पादन कमी करण्यास सर्वात मोठे कारण म्हणून उदयास आला.
खरं पाहता रासायनिक खतांचा वापर सर्व देशात अमर्यादितपणे सुरु आहे, मात्र महाराष्ट्रात याचे प्रमाण इतर राज्यांपेक्षा अधिक आहे आणि ही निश्चितच महाराष्ट्रातील (Maharashtra Farmers) शेतकऱ्यांसाठी तसेच शेतीसाठी एक चिंतेची बाब आहे.
रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना यातून सुरुवातीला चांगले उत्पन्न मिळाले मात्र आता यामुळे अनेक गंभीर परिणाम समोर येऊ लागले आहेत.
यामुळे शेतजमिनीचा पोत खालवला जातं असून मानवी आरोग्यावर देखील याचा विपरीत परिणाम होतं आहे. यामुळे रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापराला आळा घालण्यासाठी आता देशात वेगवेगळ्या योजना सुरु करण्यात आल्या असून सेंद्रिय शेतीला अधिकाधिक प्रोत्साहन दिले जात आहे.
याचीच झांकी नुकत्याच काही महिन्यांपूर्वी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात देखील बघायला मिळाली. यावेळी मोदी सरकारने (Modi Government) झिरो बजेट फार्मिंग, नैसर्गिक शेती तसेच सेंद्रिय शेतीच्या (Organic Farming) संकल्पना स्पष्ट केल्या.
याशिवाय सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार असल्याचे नमूद केले. आता याच यादीत एक भन्नाट संशोधन समोर आले आहे.
मित्रांनो फ्रान्समधील संशोधकांनी (Researchers in France) रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर व त्यामुळे होणारे नुकसान याची दखल घेत रासायनिक खतांना एक प्रभावी पर्याय शोधून काढला आहे.
फ्रांसच्या संशोधकांनी रासायनिक खतांऐवजी मानवी मूत्राचा वापर अधिक कारगर असल्याचे सांगितले आहे. खरं पाहता रासायनिक खतांसाठी जैविक पर्याय शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून अहोरात्र काबाडकष्ट करत आहेत.
फ्रान्समधील या संशोधकांचे हे संशोधन देखील याच संशोधनापैकी एक आहे. संशोधकांना संशोधनात असे आढळून आले की, रासायनिक खतांऐवजी मानवी मूत्राचा वापर केला तर पिकाची वाढ जोमदार होते शिवाय उत्पादनातही वाढ होते.
फ्रांसचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ फॅबियन एस्कुलियर यांनी सांगितले की, रासायनिक खतांमध्ये पीक वाढीसाठी आवश्यक ते घटक असतात ते सर्व घटक मानवी मूत्रामध्ये भरलेले असतात. त्यांच्या मते, पिकांच्या वाढीसाठी नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम अर्थात एनपीके या घटकांची नितांत आवश्यकता असते.
रासायनिक खतांद्वारे याच घटकांची पूर्तता केली जात असते. हे घटक मानवी मूत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. मात्र मानवी मूत्र तसेच वापरता येऊ शकत नाही तर यासाठी काही प्रक्रिया करणे अतिशय महत्त्वाचे असते.
प्रक्रिया केल्यानंतर निश्चितच मानवी मूत्राचा वापर रासायनिक खतांऐवजी शेतीमध्ये केला जाऊ शकतो. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक सांगतात की पूर्वी मानवी मलमूत्राचा वापर पिकाच्या जोमदार वाढीसाठी केला जात होता.
आता पुन्हा एकदा तीच पारंपारिक पद्धत आत्मसात करण्याची वेळ आली असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच फ्रान्समधील हे भन्नाट संशोधन सेंद्रिय शेतीमध्ये एक मैलाचे पाऊल ठरणार आहे.