कोपरगावचे आकाश नागरे यांच्यासह शेकडो युवक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- जुन्या पिढीतील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते लहानु भाऊ पाटील नागरे यांचे नातू व कोपरगाव तालुक्यातील धडाडीचे युवक नेतृत्व आकाश संजय नागरे यांनी काल राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयांमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आकाश संजय नागरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे,

जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, कोपरगाव एनएसयूआयचे समन्वय शेखर सोसे, तसेच कोपरगावचे प्रशांत अहिरे, रोहन कुलकर्णी, समीर नागरे, अजिंक्य बनसोडे, सुरेश शिंदे, प्रशांत भास्कर, दत्ता डोखे, लखन बिडवे, तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, विजय जाधव,

सुनील साळुंखे, विजय तांगडे, बाबु मनियार, युनूस हसन, युनूस शेख, इब्राहीम शेख, रवींद्र साबळे, राजेंद्र घोडेराव, बबलू जावळे, महिला अनुसूचित जाती-जमातीच्या अध्यक्षा सविता विधाते, मंगल आव्हाड, रेखा बनसोडे, अनिता चव्हाण, नीता गुंजाळ, मुक्ता कुदळे, अलका भोसले आदी उपस्थित होत्या.

अहमदनगर हा काँग्रेस विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. कोपरगाव तालुक्यात ही मूळ काँग्रेसची विचारधारा आहे. या विचारधारेवर लहान भाऊ नागरे यांनी सातत्याने काम केले आहे.

तोच आदर्श पुढे घेऊन व पुरोगामी विचारांचा प्रभाव टिकवण्यासाठी कोपरगाव मधील धडाडीचे युवक कार्यकर्ते आकाश संजय नागरे यांनी राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस मध्ये आपल्या समर्थकांसह प्रवेश केला आहे.

मुंबई येथे प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयामध्ये हा प्रवेश झाला. यावेळी बोलताना नामदार थोरात म्हणाले की, काँग्रेसला त्यागाची व बलिदानाची मोठी परंपरा आहे. अहमदनगर जिल्हा तर काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे.

काँग्रेसमध्ये तरुणांना मोठी संधी असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुण कार्यकर्ते व जिल्ह्यातील जुने कार्यकर्ते ही काँग्रेस पक्षामध्ये सामील होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या ओढा वाढला आहे.

लोकशाही व राज्यघटना टिकवण्यासाठी काँग्रेसचा विचार अत्यंत महत्त्वाचा असून तरुणांनी ही जबाबदारी खांद्यावर पेलत पक्षासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले. तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षामध्ये नव्यानं अनेक कार्यकर्ते येत असून उत्तर महाराष्ट्रामध्ये याची मोठी संख्या आहे.

महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला एक चांगली दिशा मिळाली असून तरुणांमध्ये कॉंग्रेसची लोकप्रियता वाढत आहे. तर आकाश नागरे म्हणाले की, सध्याच्या देशातील अस्थिर परिस्थिती मध्ये कॉंग्रेस हाच राज्यघटने बांधील असलेल्या विचारांचा पक्ष आहे.

या पक्षांमध्ये तरुणांना मोठी संधी असून महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यात व राज्यामध्ये काँग्रेस बळकटीकरण सुरू आहे.

नामदार थोरात यांच्या सुसंस्कृत नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास असून आगामी काळात पूर्ण ताकदीनिशी आपण काँग्रेस पक्षासाठी काम करू असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे यांनी केले.