चक्रीवादळाचा महावितरणला फटका तब्बल ३ हजार २८६ रोहीत्र पडले बंद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- तौक्ते या चक्रीवादळाचा महावितरणला राज्यातील अनेक भागासह जिल्ह्यात देखील मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाच्या फटक्यामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विद्युत यंत्रणेचे नुकसान झाले असून, अनेक भागातील  वीजपुरवठा खंडित झाला.

त्यापैकी बहुतांश भागील वीजपुरवठा तात्काळ सुरु करण्यात आला तर अनेक भाग सुरु करण्यासाठी महावितरणची यंत्रणा कार्यरत आहे. वाऱ्याची तीव्रता कमी होताच महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू केले आहे.

वादळाच्या फटक्यामुळे जिल्ह्यात ५ वीज उपकेंद्र प्रभावित झाले होते त्यापैकी ही सर्व ५ ही उपकेंद्र सुरु करण्यात आले. ११९ वीज वाहिन्या बंद पडल्या त्यापैकी ४७ तर ३,२८६रोहित्रे बंद झाली होती, त्यापैकी १२१२ रोहित्रे सुरु करण्यात आली, २९९ गावे सुद्धा प्रभावित झाली

त्यापैकी अनेक गावे सुरु करण्यात आली.  उर्वरित बंद असलेली यंत्रणा सुद्धा पूर्ववत करण्याचे कार्य युद्धस्तरावर गतीने सुरु आहे. चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी महावितरणने सर्व ठिकाणी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

तसेच खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद केला होता. या वीज बंदमुळे सुद्धा ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. वाढत्या तापमानामुळे वीजवाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटरवर पावसाचे पाणी पडल्याने

ते पंक्चर होऊन वीजपुरवठा बाधित झाला आहे. याशिवाय झाडाच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्याने व वाऱ्यामुळे वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा बाधित झाला. मात्र या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर महावितरण सतर्क असून बंद झालेला पुरवठा तात्काळ सुरु करण्यासाठी कार्यरत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24