Vivo Smartphone Offer : त्वरा करा!!! 10,000 पेक्षा कमी किमतीत घरी आणा Vivo चा शक्तिशाली फोन


विवोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण त्यांची आता स्मार्टफोन खरेदीवर हजारो रुपयांची बचत होणार आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vivo Smartphone Offer : जर तुम्ही विवोचा नवीन स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता फ्लिपकार्टच्या बिग बचत धमाल सेल सुरु आहे. या सेलदरम्यान तुम्ही Vivo Y15s हा शक्तिशाली स्मार्टफोन विकत घेऊ शकता.

कंपनीच्या या स्मार्टफोनची मूळ किंमत 13,990 रुपये इतकी आहे. परंतु, या फोनवर आता 32 % डिस्काउंट तसेच एक्सचेंज बोनस मिळत आहे. या एक्सचेंज बोनस आणि डिस्काउंटनंतर तुम्ही हा फोन खूप स्वस्तात खरेदी करू शकता. हे लक्षात घ्या की ही ऑफर आता फक्त 2 दिवसच असणार आहे.

जाणून घ्या वीवो Y15s चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीकडून या फोनमध्ये 1600×720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.51-इंच HD+ डिस्प्ले देण्यात येत आहे. स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 3 GB रॅम आणि 64 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज वेरिएंटमध्ये येतो. तसेच प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये MediaTek Helio P35 चिपसेट देत आहे. तर फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे दिले आहेत. यामध्ये 13-मेगापिक्सेल प्राइमरी लेन्ससह 2-मेगापिक्सलचा दुय्यम कॅमेऱ्याचा समावेश आहे.

इतकेच नाही तर कंपनी सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 8-मेगापिक्सेल कॅमेरा देत आहे. तर फिंगरप्रिंट सेन्सरसह येणाऱ्या या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी दिली जाईल. ही बॅटरी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनच्या OS बद्दल बोलायचे झाल्यास कंपनीचा हा फोन Android 11 Go Edition वर आधारित Funtouch OS 11.1 वर काम करेल. तर कनेक्टिव्हिटीसाठी यात Wi-Fi 2.4GHz/5GHz, Bluetooth 5.0, Micro USB 2.0, GPS आणि 3.5mm हेडफोन जॅक पर्याय आहेत.