अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- तुझ्या पत्नीमुळे आमची आब्रू गेली आहे. म्हणून तू तुझ्या पत्नीस माहेरी नेऊन घाल. असे म्हणत चार जणांनी मिळून एका पती-पत्नीस शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.(abused and beaten)
तसेच त्या महिलेच्या विनयभंग केल्याची घटना दिनांक २८ डिसेंबर रोजी घडली आहे. दिनांक २८ डिसेंबर रोजी साडेनऊ वाजे दरम्यान आरोपी हे फिर्यादी महिलेच्या पतीला म्हणाले कि, तूझ्या पत्नीमुळे आमची आब्रू गेली आहे. म्हणून तू तूझ्या पत्नीला माहेरी नेवून घाल.
असे म्हणत फिर्यादी महिलेच्या पतीला शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण करु लागले. तेव्हा फिर्यादी महिला आरोपींना समजावून सांगत असताना आरोपींनी तिलापण शिवीगाळ करून लाथा बूक्क्यांनी मारहाण केली.
तसेच एका आरोपीने त्या महिलेची साडी ओढून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. असे सदर महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
सदर २९ वर्षीय महिलेने राहुरी पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी कानिफनाथ बापूसाहेब पेरणे, अनिता कानिफनाथ पेरणे, आकाश कानिफनाथ पेरणे,
आकांक्षा कानिफनाथ पेरणे सर्व राहणार तांदूळवाडी ता. राहुरी. या चार जणां विरोधात विनयभंग, मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक प्रवीण खंडागळे हे करीत आहेत.