कोपरगावात बांधाच्या वादावरून नवरा – बायकोला बेदम मारहाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथे बांधावरील झाडाझुडपांच्या वादावरून पती पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली.

याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणपत गंगाधर गागरे, गंगाधर चांगदेव गागरे, माया गणपत गागरे, कांताबाई गंगाधर गागरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी भाऊसाहेब पाडेकर व आरोपी गणपत गागरे यांचे शेत एकमेकांच्या शेजारी-शेजारी आहे. वर्तमानात शेतकऱ्यांची पावसाची शक्यता वाढल्याने खरीप पिकांची पूर्व मशागत करण्याची घाई सुरू असून

त्यासाठी फिर्यादी व आरोपी हे आपल्या धोत्रे शिवारातील शेतात गेले.दरम्यान त्या ठिकाणी फिर्यादी पाडेकर यांनी वरील चौघा आरोपींना शेताच्या सामायिक बांधावरील झुडपे काढून घ्या त्यामुळे असावा पडतो”

असे म्हटल्याचा राग येऊन त्यांनी गणपत गागरे याने आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा चावा घेतला व गंगाधर गागरे याने डाव्या हाताच्या अंगठ्या शेजारी असलेल्या बोटास चावा घेऊन जखमी करून

आपल्याला व आपल्या पत्नीस लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली असल्याचा गुन्हा फिर्यादी भाऊसाहेब पाडेकर यांनी दाखल केला आहे. याप्रकरणी निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल म्हस्के हे करीत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24