अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा व त्यानंतर काही अभिनेत्रींनीं केलेले आरोप यामुळे मोठा कल्लोळ माजला होता. यातच आता या प्रकरणी एक मोठी माहिती समोर येत आहे.
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिच्या विरोधात ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिनं राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात लैंगिक छळ, फसवणूक व धमक्या दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती.
त्यावर प्रत्युत्तर देत आता राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी शर्लिन चोप्रा हिला थेट कोर्टात खेचलं आहे. शर्लिन चोप्रानं केलेले सर्व आरोप खोटे आणि तथ्यहिन असल्याचं राज कुंद्रा व शिल्पा शेट्टी यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.
शर्लिन केलेल्या आरोपांविरोधात ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा आम्ही कोर्टात केला आहे, असंही वकिलांनी सांगितलं. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वकिलांनी शर्लिन चोप्रा हिला नोटिस धाडली असून
त्यात तिनं केलेले आरोप खोटे, निराधार आणि तथ्यहिन असल्याचं म्हटलं आहे. समाजात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना बदनाम करण्यासाठी शर्लिन चोप्रानं असे खोटे आरोप केल्याचंही नोटिसीमध्ये नमूद करण्यात आलं आहे.