अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- कामाचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून दोघा भावांनी एका कुटुंबाला शिवीगाळ, मारहाण करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.
तपोवन रोड परिसरात शनिवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी कुटुंबातील महिलेने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून गोरख तांदळे,
रमेश तांदळे (रा. लेखानगर) यांच्याविरोधात विनयभंग, शिवीगाळ, मारहाण, पोक्सो, अॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी महिला हिच्या पतीने २३ जून रोजी रमेश तांदळे याला फोन करून कामाचे पैसे मागितले, तेव्हा त्याने शिवीगाळ केली होती.
त्यानंतर, रविवारी रमेश याचा भाऊ गोरख याने फिर्यादीच्या घरी येऊन तिच्या मुलीचा विनयभंग करत शिवीगाळ केली.
तसेच तिच्या पतीला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली, असे या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे हे पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी विनयभंग, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध व पोस्को कलमांतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.