अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-नगर शहरातील एका उपनगरात एका महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीसह मुलाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
दरम्यान या प्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दाखल फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात राजू उर्फ राजेश सुखदेव पवार याच्याविरोधात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पिडीत महिलेचे कुटुंबीय व आरोपी हे शेजारी राहतात. पवार याने पिडीत महिलेचा विनयभंग केला.
पिडीत महिला व तिच्या पतीने विचारणा केली असता आरोपी राजेश पवार याने पतीसह मुलास मारहाण केली.
त्यामुळे या पिडीत महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.