अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- एका विवाहितेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना राहाता तालुक्यातील रांजणखोल येथे घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये आबासाहेब लिंबाजी ढोकचौळे, गणेश आबासाहेब ढोकचौळे, महेश दत्तात्रय ढोकचौळे, रोहित दत्तात्रय ढोकचौळे, बाबासाहेब हरिचंद्र ढोकचौळे, लिला आबासाहेब ढोकचौळे (सर्व रा. रांजणखोल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत याप्रकरणी निलेश विजय जाधव यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान फिर्यादीत म्हंटले आहे कि, आमच्या घराशेजारी राहणारा आबासाहेब ढोकचौळे याने दारू पिऊन येऊन काही कारण नसताना माझी पत्नी व मला शिवीगाळ केली. त्यावेळी माझी पत्नी व मी त्यांना शिवीगाळ करू नका, म्हणून सांगितले.
त्यानंतर वाद होऊ नये म्हणून मी गावात निघून गेलो व त्यानंतर थोड्यावेळाने घरी भांङणे झाली असल्याचे फोनवरून समजले.
मी घरी आलो असता आबासाहेब ढोकचौळे व गणेश ढोकचौळे मला म्हणाला की, तुझ्या घरासमोरील गटार माझ्या हद्दीत आहे, ती जागा तुम्ही वापरू नका, तसेच आम्ही खुप जणांना गावाच्या बाहेर काढले आहे तुम्हालाही काढू, अशी धमकी दिली.
यावेळी त्यांनी माझी पत्नी, आई, वडिलांना शिवीगाळ केली. शिवीगाळ का करता, असे विचारल्यावर माझी पत्नी व मला 6 जणांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.