अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील ४३ वर्षीय विवाहित व्यक्तीने राहात्या घरात साडीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
बेलापूर येथील सुनिल विनायक गायकवाड (वय ४३) याने आपल्या राहत्या घरात घरातच साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेवुन आत्महत्या केली.
मयत सुनिल याची पत्नी माहेरी गेली असताना घरात कुणी नसताना गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती मिळताच बेलापुर पोलीस स्दुरक्षेत्राचे हवालदार अतुल लोटके व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
सुनिल यास खाली उतरुन श्रीरामपुर येथील साखर कामगार हाँस्पीटलला दाखल केले असता डाँक्टरांनी त्यास मृत घोषित केले .
मृतदेहाचे शवविच्छेदन करुन ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येऊन बेलापुर येथील स्मशानभुमीत शोकाकुल वातावरणात त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्या वेळी जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे पोलीस पाटील अशोक प्रधान उपस्थित होते काही दिवसापासून सुनिल हा प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याची गावात चर्चा सुरु असुन सुनिलच्या आत्महत्येचे खरे कारण काय ?
या बाबत नागरीकात उलट सुलट चर्चा चालू आहे त्याच्या पश्चात आई पत्नी व चार लहान मुली भाऊ भावजयी असा परिवार आहे.