अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- आज १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे… आजच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीसमोर प्रेमाच्या भावना व्यक्त केल्या जातात.
मात्र आजच्या दिवशी एका नवऱ्याने आपल्या पत्नीला चक्क असे गिफ्ट दिले आहे जे ऐकून तुम्हीही म्हणाल व्वा क्या बात हे… गुजरातमधील रहिवासी विनोद पटेल यांनी आपल्या पत्नीला किडनी दान केली आहे.
व्हॅलेंटाईन डे’चं औचित्य साधून विनोद यांनी आपल्या आजारी पत्नीला किडनी गिफ्ट केली आहे. मागील तीन वर्षांपासून रिता पटेल या ऑटोइम्यून किडनी डिस्फंक्शन या आजाराचा सामना करत आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून गुजरातमधील अहमदाबाद शहरात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र अजूनही त्यांचा किडनीचा आजार पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यांची प्रकृती खालावत चालली होती.
तेव्हा त्यांचे पती विनोद पटेल किडनी दानासाठी पुढे आले. विशेष म्हणजे त्यांची किडनी त्यांना योग्य असल्याचे स्पष्ट झाल्याने दांपत्याने सुटकेचा श्वास सोडला. आजच विनोद त्यांची किडनी पत्नीसाठी देणार आहेत.