माजी नगरसेविकेस शिवीगाळ करून पतीस जीवे मारण्याची धमकी!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- सध्या शहरात मोठ्या प्रमाणात भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच अनेक वेळा जुन्या वादातून वादाच्या घटना देखील होत आहेत.

अशाच प्रकारची घटना भुतकरवाडी परिसरात घडली आहे. यात चक्क माजी नगरसेविकेच्या पतीलाच तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.याबाबत हनुमंत भुतकर यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, गुरूवारी रात्री महापालिकेच्या माजी नगरसेविका सारिका भूतकर व त्यांचे पती हनुमंत भुतकर हे घरात होते.

यावेळी विकी कांबळे, अनिल घोरपडे आणि अनोळखी दोघेजन घरासमोर उभे राहीले व तुम्ही आमच्यावर केस करता का असे म्हणत सारिका भूतकर यांना शिवीगाळ केली तर हनुमंत भूतकर यांना तलवार दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली.

]या घटनेनंतर भुतकर यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24