अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-गोठ्यात गायीचे दूध निघत नव्हते याच कारणातून पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले.
या भांडणातून नवरा शिवाजी याने पत्नी भारती हिच्या डोक्यात दगड घालून तिला गोठ्यातच जीवे ठार मारून खून केला.
हि खळबळजनक घटना बुधवारी सायं. ६ वा. संगमनेर तालुक्यातील तळेगावदिघे परिसरातील बोडखेवाडी परिसरात घडली.
पोलिसांनी आरोपी शिवाजी रामनाथ दिघे, वय ३३, रा. बोडखेवाडी, याला अटक केली आहे. याप्रकरणी मयत भारती शिवाजी दिघे वय २८ रा. बोडखेवाडी,
तळेगाव दिघे हिचा खून केला म्हणून फिर्यादी महेश जिजाबा वाणी, वय ३०, धंदा शेती, रा, नात्रजदुमाला,
ता. संगमनेर यांच्या फिर्यादीवरुन आरोपी शिवाजी रामनाथ दिघे याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादीत म्हटले आहे की, भारतीशिवाजी दिघे व आरोपी शिवाजी रामनाथ दिघे हे नात्याने पती-पत्नी असून ते त्यांच्या घरासमोरील गोठ्यात गेले असता त्यांचे गायीच्या कासाला सूज आली होती.
त्यामुळे गाईचे दूध निघत नव्हते. गाईचे कासाला बर्फ लावणे गरजेचे असताना या कारणावरुनच पती -पत्नीत वाद झाला.
यावरून शिवाजी दिघे याला राग अनावर झाल्याने त्याने पत्नी भारती हिच्या डोक्यात दगड मारुन तिचा खून केला.
घटनास्थळी डिवायएसपी मदने, पोनि पवार यांनी भेट दिली. पोसई पवार हे पुढील तपास करीत आहेत.