Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Hyundai Ai3 : Tata ला टक्कर देण्यासाठी Hyundai आणत आहे शक्तिशाली कार, मिळणार लक्झरी कारसारखे फीचर्स; पहा किंमत

लवकरच भारतीय मार्केटमध्ये Hyundai Ai3 लाँच होणार आहे. सर्वात म्हणजे वापरकर्त्यांना आता यात लक्झरी कारसारखे फीचर्स पाहायला मिळतील.

Hyundai Ai3 : ह्युंदाई ही भारतातील सर्वात आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे. कंपनी सतत नवनवीन फीचर्स असणाऱ्या कार भारतीय बाजारात लाँच करत असते. अशातच कंपनी आपली आगामी कार लाँच करण्याच्या तयारीत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कंपनी या कारवर अनेक दिवसांपासून काम करत होती. कंपनी लवकरच बाजारात Hyundai Ai3 लाँच करणार आहे. ही कार लाँच झाल्यानंतर टाटा मोटर्सला कडवी टक्कर देईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आगामी कारमध्ये लक्झरी कारसारखे फीचर्स वापरकर्त्यांना पाहायला मिळतील.

जाणून घ्या Hyundai Ai3 ची पॉवरट्रेन..

नवीन ह्युंदाई कारमध्ये एक मजबूत पॉवरट्रेन वापरकर्त्यांना दिसण्याची शक्यता आहे. या नवीन कारमध्ये कंपनी 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देऊ शकते. हे इंजिन 82 Bhp च्या कमाल पॉवरवर 113 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असणार आहे. इतकेच नाही तर, या कारचे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडण्यात येणार आहे.

वैशिष्ट्ये

या कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनी यामध्ये अनेक अॅडव्हान्स फीचर्स देण्याची शक्यता आहे. यामध्ये कंपनी क्रूझ कंट्रोल, 16-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 14-इंच टचस्क्रीन डिस्प्ले, रिअर पार्किंग सेन्सर, रिअर व्ह्यू कॅमेरा, ऑटो स्टार्ट-स्टॉप सिस्टम, ईबीएससह अनेक शानदार फीचर्स देणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनी या कारमध्ये 6 एअरबॅग देण्याची शक्यता आहे.

किती असणार किंमत?

हे लक्षात घ्या की कंपनीने आतापर्यंत तिच्या आगामी कारचे अनावरण केलेले नाही. परंतु असे मानले जात आहे की कंपनी ही कार बाजारात 10 ते 12 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च होऊ शकते.