Hyundai Tucson launch: ‘या’ दिवशी भारतात Hyundai Tucson होणार लाँच ; Tata Safari देणार टक्कर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hyundai Tucson launch:  Hyundai उद्या भारतीय बाजारपेठेत (Indian market) आपली प्रीमियम सेगमेंट SUV Tucson सादर करणार आहे. सध्या कंपनीने बुकिंग आणि किंमतीशी संबंधित कोणत्याही डिटेल्स जारी केलेली नाही. पण, आम्ही या कारच्या इंजिन, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित काही माहिती तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घ्या या कारशी संबंधित सर्वकाही.


Hyundai Tucson इंजिन
Hyundai  ने या क्षणी Tucson च्या इंजिनबद्दल (Engine) जास्त खुलासा केलेला नाही. पण या इंजिनमध्ये तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल दोन्हीचा पर्याय मिळेल. ही दोन्ही इंजिन 2.0L असणार आहेत. या कारमध्ये Hyundai Alcazar चे पेट्रोल इंजिन वापरण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंपनी त्याच्या टॉप व्हेरियंटवर ऑल व्हील ड्राइव्हला सपोर्ट करणार आहे.

Hyundai Tucson इंटीरियर
प्रीमियम एसयूव्ही असल्याने या कारमध्ये तुम्हाला अनेक प्रीमियम फीचर्स मिळणार आहेत. त्याच्या आतील फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला यामध्ये दोन 10.3-इंचाची टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम दिली जाऊ शकते.

या कारमध्ये तुम्ही पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील पाहू शकता. चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीने या कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेचा सपोर्टही दिला आहे. दोन डिव्हाइस ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टम, अॅम्बियंट लाइटिंगसाठी 64 लाइट्स, बोस साउंड सिस्टम, फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, व्हेंटिलेटेड सीट्स, मल्टीपल एअर बॅग आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल यांसारखी अनेक फीचर्स प्रदान करण्यात आली आहेत.

Hyundai Tucson एक्सटेरियर
जर आपण या कारची त्याचची मागच्या जेनरेशनशी तुलना केली तर तिचा व्हीलबेस 3.4 इंच लांब आहे. या कारचे डिझाइन फिलॉसॉफी पॅरामेट्रिक डायनॅमिक म्हणून ओळखले जाते. त्याच्या फ्रंट साईडला ग्रिलच्या जाळीचा वापर करण्यात आला आहे.

कंपनीने त्याची ग्रिल LED DRL ला जोडली आहे. SUV असल्याने या कारमध्ये 18-इंच अलॉय व्हील वापरण्यात आले आहेत. त्याच्या रियर लुकबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला त्यात एलईडी टेललाइट्स पाहायला मिळतात.

Hyundai Tucson कम्पटीशन
या कारची किंमत जवळपास 25 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. ही कार भारतात लाँच केल्यानंतर त्याची स्पर्धा Jeep Compass, Citroen C5 Aircross, Volkswagen Tiguan, XUV 700 आणि Tata safari यांसारख्या कारशी होणार आहे.