Hyundai Ai3 SUV : टाटा पंचला टक्कर देण्यासाठी येतेय ह्युंदाईची नवीन SUV, कमी किमतीत मिळणार शानदार फीचर्स

Hyundai Ai3 SUV : ह्युंदाई ही एका छोट्या SUV वर काम करत आहे. या कारची चाचणी सुरु असून लवकरच ती भारतीय बाजारपेठेमध्ये लाँच केली जाणार आहे.

ही कार मार्केटमध्ये टाटा पंचला टक्कर देईल. दरम्यान टाटा पंच मार्केटमध्ये लाँच झाल्यानंतर खूप प्रसिद्ध झाली होती. परंतु, ह्युंदाईच्या या कारसाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पॉवरफुल इंजिन

Hyundai Ai3 SUV भारतीय बाजारपेठेसाठी विकसित केले जाणार आहे. ही कार येत्या ऑटो एक्सपो 2023 मध्ये प्रदर्शित केली जाण्याची शक्यता असून कॅस्परपेक्षा थोडी वेळी असू शकते.

या SUV ची लांबी 3.7 किंवा 3.8 मीटर पर्यंत असू शकते. तसेच तुम्हाला 1.0 लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.0 लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन पहायला मिळेल, जे अनुक्रमे 75bhp आणि 99bhp पर्यंत पॉवर जनरेट करेल. ही SUV मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही पर्यायांमध्ये येऊ शकते. त्याचबरोबर ह्युंदाई AI3 सीएनजी पर्यायाही येऊ शकते.

सनरूफ मिळेल

फीचर्स आणि लूकबद्दल सांगायचे झाल्यास, यामध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प, LED DRLs, आयताकृती आकाराचे हेडलॅम्प आणि स्टायलिश टेललॅम्प यासह इतर अनेक विशेष बाह्य फीचर्स पाहायला मिळू शकतात.

त्याचबरोबर यामध्ये जबरदस्त इंटिरियर्स तसेच डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इलेक्ट्रिक सनरूफ, ऑटोमॅटिक एसी, 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि अनेक स्टॅंडर्ड आणि सुरक्षितता फीचर्स पाहायला मिळतील.