नोकरीसाठी तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली आणि नंतर झाले असे काही…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-समाज कल्याण अधिकाऱ्यांकडे अनुकंपा तत्वावर नोकरी मागण्यासाठी गेलेल्या तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.

त्यामुळे लातूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनीही जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.

मात्र पीडित तरुणी मला फसवत असल्याचा आरोप जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी केला आहे. लातूर शहरात राहणाऱ्या या २२ वर्षीय तरुणीचे वडील जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण खात्याअंतर्गत येणाऱ्या मतिमंद विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीला होते.

मात्र वर्ष २००७ मध्ये त्यांचे निधन झाले. पुढे शिक्षण पूर्ण करून वडिलांच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी म्हणून या २२ वर्षीय तरुणीने रीतसर अर्ज केला.

मात्र सतत पाठपुरावा केल्यानंतर नियुक्ती देण्यासाठी लातूरचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी पैसे आणि शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप या तरुणीने केला आहे.

पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लैंगिक शोषण कलम तसेच ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24