मी पैसे घेऊन पळालो नाही; अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचे स्पष्टीकरण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- तालिबानी काबूलमध्ये पोहोचल्यानंतर देश सोडून निघून गेलेले अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी स्वतः वर लागलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

‘माझ्याकडे चप्पल बदलण्याचाही वेळ नव्हता, मी पैसे घेऊन पळालो नाही असं म्हणत त्यांनी आपली बाजू मांडली आहे.’ ते पुढे म्हणाले,’तालिबा आणि अफगाणी सरकार हे आमचं दोघांचे अपयश आहे.

कारण आम्ही कधीच आमचं सरकार आणि तालिबा दोघे स्वतःच्या समाधानापर्यंत पोहोचल नाही. माझ्या बाबत अनेक खोट्या बातम्या येत आहे कि मी देश सोडतांना रोकड घेऊन पळालो.

मात्र हे आरोप पूर्ण पणे खोटे आहे. मी देशात असतो तर मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला असता आणि हिंसा आणि नासधूस झाली असती म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव देश सोडला आहे. देश सोडतांना मला चप्पल बदलण्यासही वेळ नव्हता.

‘ मला तालिबानला शांततेच्या मार्गाने सत्ता द्यायची होती. पण माझ्या इच्छेविरुद्ध मला अफगाणिस्तानातून बाहेर पाठवण्यात आले. मला सांगण्यात आले की तालिबान काबूलमध्ये आहेत.

तालिबानशी आमचा करार होता की ते काबूलमध्ये प्रवेश करणार नाहीत पण त्यांनी करार मोडला. मला राष्ट्राध्यक्ष म्हणून फासावर लटकायचं नव्हतं. कारण मी अफगाणिस्तानची प्रतिष्ठा होतो. मी मृत्यूला घाबरत नाही, असंही अशरफ गनी यांनी स्पष्टीकरणात म्हटलं आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24