ताज्या बातम्या

Maharashtra : “मी मला मुख्यमंत्री करा म्हणालो नव्हतो, तर रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याबाबत बोललेलो” अब्दुल सत्तारांनी ठाकरेंना डिवचलं

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra : महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी सत्ताबदल झाला आहे. शिवसेनेतील काही आमदारांनी बंडखोरी करत भाजपबरोबर सत्ता स्थापन केल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. मात्र जुन्या किस्स्यांवरून अजूनही शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये टीकास्त्र सुरूच आहे.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा डिवचलं आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून अब्दुल सत्तार यांना काय प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अब्दुल सत्तार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, किमान त्या खुर्ची वर बसणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करा, असं मी म्हणालो होतो. रश्मी वहिनींना मुख्यमंत्री करा, असा प्रस्तावही मी ठेवला होता.

कारण अडीच वर्षात काळात उद्धव ठाकरे फक्त ४ वेळा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसलेले दिसले. मी मंत्री असूनही त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेलं बघितले नाही. तर सर्वसामान्य लोकांना ते काय दिसणार? असा टोला सत्तारांनी ठाकरेंना लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, ठाकरे घरणाच्या दुसऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करावे असे माझे मत होते. मी मला मुख्यमंत्री करा म्हणालो नव्हतो, तर रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याबाबत बोललेलो. त्यामुळे शरद पवार आणि सोनिया गांधी यांनाही मान्य असायला हवे होते, असेही अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार पुन्हा एकदा गुवाहाटी दौऱ्यावर गेले आहेत. मात्र काही आमदार त्यांच्यासोबत गेले नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामध्ये अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे.

मात्र अब्दुल सत्तार नाराज असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. स्वतः अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

ते म्हणाले, एकनाथ शिंदे आणि माझ्या संबंधांमध्ये कुठलाही दुरावा नाही. मी कुणावरही नाराज नाही. माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत. इथे माझी काही कामे असल्याने मी थांबलोय असे सत्तार यांनी सांगितले आहे.

Ahmednagarlive24 Office