मला प्रशांत किशोरची गरज नाही…?

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या वर्तुळात सुरू होती.

मात्र, ही चर्चा नाकारत शरद पवार यांनी भविष्यातील राजकीय मोर्चेबांधणी कशी असेल, यावर भाष्य केले. शरद पवार म्हणाले, मला प्रशांत किशोर यांची मदत घ्यायची कोणतीच गरज नाही.

तसेच सध्या मला सत्तेत बसण्याचीही कुठली महत्त्वाकांक्षा नाही. पण विरोधी पक्षांमध्ये समन्वयाचं राजकारण घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करेल. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीवर परखड भाष्य केले.

ते म्हणाले आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातील एखाद्या जमीनदारासारखी आहे. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सर्व हिरवेगार शिवार माझे होते, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झाली आहे.

Ahmednagarlive24 Office