महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही…’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- “१५ जुलैला फडणवीस आणि भुजबळ भेटतात (निरोप घेऊन?), १६ जुलैला फडणवीस दिल्लीला जातात, १७ जुलैला शरद पवार दिल्लीला जाऊन मोदींना भेटतात.

महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही, अशी खोचक टीप्पणी अंजली दमानिया यांनी ट्वीटद्वारे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

सहकार क्षेत्राविषयी ही भेट झाल्याचं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी जरी सांगितलं असलं, तरी त्यावर राजकीय विश्लेषक आणि इतरांचा विश्वास बसलेला नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या भेटीसंदर्भात ट्वीट करून खोचक टोला लगावला आहे.

तसेच, या भेटीचा थेट संबंध राज्याच्या राजकारणाशी जोडला आहे. त्यामुळे या भेटीनंतर राज्यातल्या राजकारणाची हवा तापू लागली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24