चक्क नोटांच्या बंडलने भरलेले कपाट सापडले… रक्कम ऐकून व्हाल आश्चर्यचकित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :-   आयकर विभागाने हैदराबादमध्ये एका औषध निर्माण म्हणजेच फार्मास्युटिकल कंपनीवर टाकलेल्या छाप्यामध्ये ५५० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढून आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या छाप्यामध्ये एका कपाटात ५०० च्या नोटा आढळून आल्या असून ही रक्कम 142 कोटी 87 लाख इतकी असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, इंटरनेटवर एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोमध्ये एका उघड्या कपाटात नोटांचे अनेक बंडल दिसत आहेत. पण कपाट नोटांनी भरलेले असल्याची कोणतीही अधिकृत माहिती आयकर विभागाने दिलेली नाही.

आयकर विभागाने 6 ऑक्टोबर रोजी अर्धा डझन राज्यांमध्ये सुमारे 50 ठिकाणी छापेमारी केली. हैदराबाद येथील एका औषध कंपनीवरही आयकर विभागाचा छापा पडला. ‘आयकर’च्या अधिका-यांनी औषध कंपनीच्या कार्यालयाची झाडाझडती घेतल्यानंतर तेथे एका कपाटात तब्बल 142 कोटी रुपये सापडले.

ही औषध कंपनीच्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विदेशात निर्यात होते. यात अमेरिका, यूरोपातील काही देश, दुबई आणि इतर आफ्रिकी देशांमध्ये कंपनीच्या उत्पादनांची निर्यात होते.

या छाप्यांमध्ये आयकर विभागाला खात्यांची माहिती असणारी पुस्तकं, डिजिटल उपकरणे, पेन ड्राइव्ह आणि बरीच कागदपत्रं हाती लागली आहेत.

अनेक बनावट तसेच अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून खरेदी करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं होतं. हा काळापैसा लपवण्यासाठी व्यवहार झाल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलेलं. तसेच जमीन खरेदीचा व्यवहार झाल्याचेही पुरावे या छापेमारीमध्ये सापडले आहेत.