अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- सरकारी योजनेतून तुम्हाला १२ हजार रूपये मिळवून देतो, असे सांगून भामट्याने वृद्धेच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. नगरपरिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीजवळील वाहने पार्किंगमध्ये बुधवारी दुपारी ही घटना घडली.
कमरूनिसा शेख (राहुरी फॅक्टरी) या राहुरी येथील खाटीकगल्लीतील भाच्याला भेटण्यासाठी आल्या होत्या. बाजारपेठेतून जात असताना भामट्याने त्यांना नगरपरिषदेत कामाला असल्याचे सांगत १२ हजार रुपये मिळवून देतो. फोटो काढण्यासाठी गळ्यातील सोन्याचे दागिने काढून द्या, असे सांगितले.
त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वृद्धेने मणिमंगळसूत्र व कानातील टॉप्स काढून पर्समध्ये ठेवत शेजारी उभ्या अनोळखी महिलेजवळ दिली भामटा वृद्धेला घेऊन नगरपरिषदेत गेला. मी पाच मिनिटांत खाली जाऊन येतो, असे सांगून भामटा पसार झाला.
दीड महिन्यांपूर्वी शुक्लेश्वर मंदिरात पूजा करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघा भामट्यांनी मंदिरालगत राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिने पूजेसाठी मागत हातोहात लांबवले. या घटनेचा अद्याप तपास लागलेला नाही.