अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- मला पहिली बायको आहे, दुसरी नको. तू दारू पिऊन काही बोलू नको. असे म्हणाल्याचा राग आल्याने प्रदीप विधाते याने अशोक विधाते व त्यांच्या पत्नीला लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील वरशिंदे येथे घडली आहे.
अशोक सिताराम विधाते यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, सायंकाळी सात वाजे दरम्यान अशोक विधाते हे राहुरी तालुक्यातील वरशिंदे गावचे चावडी समोर उभे असताना त्याच गावात राहणारा प्रदीप वसंत विधाते हा तेथे दारू पिऊन आला.
आणि अशोक विधाते यांना म्हणाला की, तुम्हाला दुसरी बायको पाहून देतो. त्यावेळेस अशोक विधाते त्याला म्हणाले की, मला पहिली बायको आहे. तू दारू पिऊन असे काही पण बोलू नको.
असे म्हणाले असता त्याचा त्याला राग येऊन त्याने फिर्यादी अशोक विधाते यांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच काहीतरी धारदार वस्तूने जखम केली यावेळी अशोक विधाते यांची पत्नी रंजना ही भांडण सोडण्यास मध्ये आल्या असता
त्यांनाही लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तुमच्या कडे पाहून घेतो. असा दम देऊन तेथून निघून गेला. घटनेनंतर अशोक विधाते यांनी तात्काळ राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रदीप वसंत विधाते याच्या विरोधात मारहाण, शिविगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.