अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांमधील वाद जगजाहीर आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. यातच नारायण राणे यांनी राज्याचे मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
56 आमदारांसह मांडीला मांडी लावून बसले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासांत इतका लाचार मुख्यमंत्री झाला नसेल. इतकी लाज कुणी आणली नाही’ असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे मैदानात उतरले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. दिल्लीत बसणारे पवार दिल्लीत शेपूट का घालतात.असे उद्धव ठाकरे म्हणाले.
कसा माणूस बदलतो बघा, शेण खाणाऱ्यांबरोबर ५६ आमदारांसह मांडीला मांडी लावून बसले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासांत इतका लाचार मुख्यमंत्री झाला नसेल. इतकी लाज कुणी आणली नाही.
लोकांचे दुर्लक्ष व्हावं म्हणून हा संजय राऊत बोलतो. शिवराळ भाषा म्हणजे मर्दानी भाषा नव्हे, अशी टीका राणेंनी केली. एकीकेड पत्रकार असल्याचं म्हणायचं दुसरीकडे छापखाणा.
उद्धव ठाकरेंना कळत नाहीय की राऊत सुरुंग लावत आहेत. त्यांना माहिती आहे, आज ना उद्या जागा खाली होणार. आता शिवसेनेत कुणी नाही. मी आहे. आधी शिव्या दिल्या, बाळासाहेबांवर आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली.
आता नेता झाले. आता पदाची अपेक्षा. थेट मुख्यमंत्रीपद हवं. एक आरोप झाला, आताच घाम फुटतोय, अजून बरंच काही निघायचंय. सगळ्यांचंच निघायचं आहे. ईडीशी बोलू नको थोडी विडी प्यायला लावतील.
आपली कुवत काय? तुम्ही आलात कधी, शिवसेनेच्या जन्मानंतर 26 वर्षांनी आलात. शिवसेना भवनासाठी तुझे पाच पैसे तरी आहेत का? आम्ही एवढं केलं म्हणून आज शिवसेनेची सत्ता आहे” असंही राणे म्हणाले.