माझे त्याच्यावर प्रेम आहे, मी मर्जीनेच त्याच्यासोबत आले…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- हल्लीच्या पिढीमध्ये लव्ह मॅरेजचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये अनेकदा अल्पवयीन मुलं-मुली देखील आढळून आल्या आहेत.

कुटुंबियांच्या विरोधाला डावलून हे प्रेमीयुगल पळून जाऊन लग्नाच्या तयारीत असतात. असाच एक प्रकार अकोले येथे घडलेला उघड झाला आहे. लग्नासाठी मुलीला तरूणाने डांबूृन ठेवल्याची तक्रार अकोले येथील एका महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिली.

पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत त्या तरूणीसह तरूणाचा पोलिसांनी शोध घेतला. पोलिसांसमोर येताच तरुणीने सांगितले, माझे त्याच्यावर प्रेम आहे, मी मर्जीनेच त्याच्यासोबत आले आहे. पोलिसांनी या तरूणीचा जबाब घेतल्यानंतर तिला सध्या स्नेहालयात दाखल केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अकोला येथील एका शिक्षिकेने रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, माझ्या 25 वर्षीय मुलीला नगर शहरातील लालटाकी येथील एका तरूणाने त्याच्या साथीदारांसह बोलावून घेत, लग्नासाठी डांबून ठेवले आहे.

अशा आशायाची फिर्याद या महिलेने दिली. याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी तत्काळ तरुण-तरुणीचा शोध घेऊन दोघांनाही लालटाकी परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांंसमोर येताच मुलीने जबाब दिला, मला कुणीही पळवून आणलेले नसून

माझे या तरुणावर प्रेम असल्याने मी मर्जीने आले आहे. मुलीचे हे वाक्य ऐकताच तिच्या आईला मोठा धक्का बसला. त्या महिलेला उपचारासाठी तत्काळ येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.

अहमदनगर लाईव्ह 24