अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्नॅपचॅटवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक नगरमध्ये घडली आहे.
विनयभंग प्रकरणातील आरोपीला नगर पोलिसांनी अवघ्या तीनच तासात बेड्या ठोकल्या आहे. गिरीष सुनिल वरकड असे आरोपी तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीसोबत ओळख केली होती. अल्पवयीन मुलगी आपल्या घराच्या गॅलरीमध्ये उभी होती.
त्यावेळी आरोपीने मुलीला उद्देशून हातवारे केले आणि तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप आहे.
आरोपी पीडित मुलीला म्हणाला, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू सोबत आली नाहीस, तर तुझ्या कुटुंबाला जीवे ठार मारेन अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपी गिरीष सुनिल वरकड याला अवघ्या तीन तासांच्या आत अटक केली असून, याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.