ताज्या बातम्या

‘तु मला खुप आवडतेस; मी तुला लाईक करतो… तरुणीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओ जेरबंद

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar Crime :- ‘तु मला खुप आवडतेस…मी तुला लाईक करतो…हातवारे करून अश्लील भाषेत बोलत अल्पवयीन विद्यार्थीनीचा पाठलाग करणाऱ्या दोघांना कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कर्जत येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता ११ वीच्या वर्गात शिकणारी मुलगी महाविद्यालयात आली असता तिला ईश्वर जयराम हुलगुंडे (रा.खंडाळा ता. कर्जत) याने हातवारे करून तिची छेड काढली.

त्यांनतर सदर मुलगी कर्जत बसस्थानक येथे आली असता तोच संबंधीत मुलगा आपल्या एका मित्रासह पिडीतेजवळ आला आणि ‘तू मला आवडतेस व मी तुला लाईक करतो’ असे म्हणुन लज्जा उत्पन्न होईल अशा अश्लील भाषेत बोलला.

त्याचवेळी त्याच्या सोबत असलेला त्याचा जोडीदार पिडीतेजवळ येऊन म्हणाला की ‘तु तुझा मोबाईल नंबर माझ्या मित्राला दे’ यावेळी दोघांनीही तिचा पाठलाग केला. भीतीपोटी सदर मुलीने कुटुंबियांना याबाबत माहिती दिली.

त्रास देणारी दोन्हीही मुले ईश्वर जयराम हुलगुंडे (रा. खंडाळा ता.कर्जत) व विजय हुलगुंडे (रा.गोयकरवाडी ता.कर्जत) अशी त्यांची नावे असल्याचे सांगितले.

पीडितेने व तिच्या भावाने कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असुन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना काही तासात अटकही करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office