अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- तालुका दूध संघाची कोट्यवधीची मालमत्ता विकली याची चौकशी केली पाहिजे. दादा पाटील यांनी मोठ्या ताकदीने कारखाना उभा केला.
या कारखान्याला कर्जपुरवठा केला नाही म्हणून कारखाना विकायला काढण्याची वेळ नगरच्या बँक संचालकामुळे आली याला जबाबदार कोण? असा सवाल प्रा. शशिकांत गाडे यांनी केला. मदडगाव सेवा सहकारी सोसायटीच्या प्रचाराचा शुंभारभ करताना ते बाेलत हाेते.
यावेळी संदेश कार्ले यांच्या माध्यमातून मंजूर विकास कामाचे उद्घाटन करण्यात अाले. या कार्यक्रमासाठी जिल्हा परीषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, संदेश कार्ले, संपत म्हस्के, जयंत वाघ, संदिप गुंड, डॉ. दिलीप पवार, प्राविण कोकाटे, रामदास भोर, राजेंद्र भगत, जीवा लगड, शंकर ढगे उपस्थित होते.
प्रताप शेळके म्हणाले, जिल्ह्यात नगर तालुक्यात सर्वात जास्त खावटी कर्ज वाटली. दिवाळी साजरी करा, रिन काढून सण का साजरा करायला लावणारा पहिला नेता भेटला, असा आपला सहकार महर्षी असल्याचे शेळके यांनी सांगितले. ज्यांनी आपल्या तालुक्यातून सहकार उचलून फेकून देण्याचे काम केले.
जिल्ह्यात सर्वात जास्त मालमत्ता असणारा आपला तालुका अाहे. दूध संघाची जागा विकली. आपला धंदा कोणता हे सांगा आमचे धंदे दिसणारे आहेत. दुसऱ्याच्या जमिनी विकून आपले पोट भरायची, कपडेसुद्धा मार्केट कमिटीमधून यांना पुरवले जातात.
कारखान्याला कर्ज दयायचे व त्याच्या कडून कमिशन घ्यायचे, यासाठी संचालक व्हायचे असेच आत्तापर्यत चालू आहे. यावेळी साहेबराव शेडाळे, अविनाश गायकवाड, प्रमोद काळे, शरद शेडाळे, विलास शेडाळे, मोहन भालेराव उपस्थित होते.