अहमदनगर Live24 टीम, 12 जुलै 2021 :- पहाटेच्या वेळी आपली आई दोन व्यक्ती सोबत बोलत असल्याचे तिच्या मुलाने पाहिले व म्हणाला मी तुमचे नाव माझ्या वडीलांना सांगून देतो. मात्र हेच वाक्य त्याच्या जीवावर बेतले. कारण वडीलांना काही सांगण्यापूर्वीच त्याचा खून करण्यात आला.
याबाबत सविस्तर असे की, नेवासा तालुक्यातील वरखेड येथे सोहम उत्तम खिलारे या आठ वर्षे वयाच्या मुलाचा डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आई सिमा खिलारे हिला पोलिसांनी अटक केली होती.
त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात आणखी दोघांची नावे समोर आली. सिमा ही खून झाल्याच्या दिवशी पहाटे आरोपी सुनिल किसन माळी व विष्णु हरिभाऊ कुंढारे या दोघांशी बोलत होती.
यावेळी सोहम तिथे आला व ‘तुमचे नाव माझ्या वडिलांना सांगून देईन’, असे म्हणाला. त्यावरून माळी याने त्याला चापटीने मारहाण केली.
सिमा हिला तेथून निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर माळी व कुंढारे या दोघांनी मुलाच्या डोक्यात दगड टाकून त्यास ठार केले, अशी कबुली आरोपींनी दिली आहे.