अहमदनगर Live24 ,31 मे 2020 : बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आणि अजय देवगण यांनी आता पर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. त्या दोघांचे ‘विजयपथ’, ‘हकीकत’, ‘तक्षक’, ‘दृश्यम’, ‘गोलमाल अगेन’, ‘दे दना दन’ हे सिनेमे सुपरहिट ठरले.
एक काळ असाही होता जेव्हा तब्बूचं नाव अजय देवगणशी जोडलं जात होतं. परंतु काही दिवसांपूर्वी तब्बूनं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे.
तिच्या अविवाहित आण्याला ती अजय देवगनला जबाबदार ठरवते. या मुलाखतीत ती तिच्या आणि अजयच्या नातेसंबंधांवर मोकळेपणानं बोलली. तब्बू म्हणाली, मी आणि अजय एकमेकांना मागच्या 25 वर्षांपासून ओळखतो.
अजय माझ्या चुलत भावाचा समीर आर्याचा शेजारी आणि खूप जवळचा मित्र होता. त्यावेळी आम्ही दोघंही एकत्र मोठे झालो आणि आमची मैत्री सुद्धा घट्ट होत गेली.
जेव्हा मी लहान होते तेव्हा समीर आणि अजय माझ्यावर लक्ष ठेवत असत. ते दोघंही माझा पाठलाग करत आणि जर एखाद्या मुलानं माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला तर हे दोघं त्याला मारण्याची धमकी देत असत.
त्यामुळे आज मी अविवाहित असण्याचं कारण अजय आहे. त्याच्या या अशा वागण्यामुळे माझं लग्न झालं नाही.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews