असे १०० सलमान गल्ली झाडायला उभे करेन, बिचुकलेंनी सलमानवर साधला निशाणा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  बिग बॉसच्या १५ च्या सिझनमधून कॉन्ट्राव्हर्सी किंग अभिजित बिचकुले नुकताच बाहेर पडला आहे. वाईल्ड कार्ड एंट्री करत बिचुकले हे बिग बॉसच्या घरात गेले होते.

बिगबॉसच्या घरात असताना त्याला अनेकदा त्यांना अभिनेता सलमान खानकडून बोलणे ही खावे लागले आहे. पण बिगबॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर कॉन्ट्राव्हर्सी किंग बिचुकलेने सलमान खानविरोधात संताप व्यक्त करत म्हणाला की,

‘इतकेच नव्हे तर, काय लायकी आहे सलमानची, सलमान स्वत:ला भाई समजतो पण मी सुद्धा दादा आहे, असे १०० सलमान गल्ली झाडायला उभे करेन’.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर बिचुकले यांनी सलमान खानच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. संतापमध्ये बिचकुले म्हणाले की, सलमानला वाटते की तो शो चालवतो पण तसे नाहीये.

बिग बॉसचा 15 वा सिझन मी चालवला आहे. काल वाघ पिंजऱ्यात होता आणि तो हंटर फिरवत होता. आता वाघ पिंजऱ्यामधून बाहेर आला आहे, असे बिचकुले म्हणाले आहे.

सलमान खान स्वत: ला काय समजतो? त्याला लवकरच दाखवून देईल की मी काय आहे. सलमान स्वतःला भाई समजतो पण त्यानेही लक्षात ठेवावे मी दादा आहे’, असे म्हणत बिचुकलेंनी सलमानवर निशाणा साधला आहे.

तसेच बिचकुले पुढे म्हणाले की, बिगबॉसच्या घरातून मी स्वत:हून बाहेर पडणार होतो, पण त्यावेळी बिग बॉसने विनंती करुन थांबवले होते. आता त्यांच्या नियमानुसार मला बाहेर काढले आहे, याबद्दलच मला काही शंका आहेत.

बिगबॉसच्या घरात लोक जाणीवपूर्वक माझ्यावर आरोप करत होते. तिथे झालेल्या भांडणात मी शिवी दिली हे जगजाहीर आहे. त्यानंतर मग सलमान खानने माझ्यावर जो राग काढला तो त्याला न शोभणारा आहे. त्याच्याबद्दलच मी मी पत्रकार परिषदेत मांडणार आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

Ahmednagarlive24 Office