ताज्या बातम्या

टीईटी घोटाळा प्रकरणी ठाण्यातून ‘या’ IAS अधिकाऱ्याला अटक

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे.

प्रशासकीय सेवेत एवढ्या बड्या मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांना न्यायालयात हजार देखील करण्यात आले आहे.

पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी सुशील खोडवेकर यांना आज ठाण्यातून अटक केली. ते २००९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात उपसचिव म्हणून ते कार्यरत होते.

तर, शिक्षक भरती परीक्षेतील गैरव्यवहारात त्यांचाही सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई केली गेली आहे.

शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक केली होती.

त्यावेळी खोडवेकर हे शिक्षण विभागात कार्यरत होते. सावरीकर याच्या सोबत खोडवेकर याचा आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले. त्यानंतर खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणातील आतापर्यंतची ही मोठी कारवाई मानली जात आहे. तसेच, आता खोडवेकर यांच्या चौकशीतून या प्रकरणात आणखी कोणकोण सहभागी आहेत, हे देखील उघड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office