IB Recruitment 2022 : 10वी पास तरुणांसाठी मोठी संधी…! इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 1671 पदांची भरती, करा असा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IB Recruitment 2022 : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंटेलिजेंस ब्युरोने (Intelligence Bureau) त्याच्या सब्सिडियरी इंटेलिजेंस ब्युरो (SIB) मध्ये 1671 सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांसाठी (Post) अर्ज (Application) आमंत्रित केले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इच्छुक उमेदवार 5 नोव्हेंबरपासून mha.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतील. सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी साठी 1521 आणि MTS साठी 150 जागा आहेत. इच्छुक उमेदवार 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज करू शकतील. तपशीलवार अधिसूचना लवकरच अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.

पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा:-

सुरक्षा सहाय्यक, कार्यकारी – 27 वर्षे.
एमटीएस – 18 ते 25 वर्षे.
SC आणि ST प्रवर्गाला उच्च वयोमर्यादेत पाच वर्षे आणि OBC साठी तीन वर्षांची सूट मिळेल.

वेतनमान

स्तर 7 (रु. 44,900-1,42,400) आणि इतर भत्ते

अर्ज शुल्क

सामान्य श्रेणी, EWS, OBC – रु 450
SC, ST – 50 रु
सर्व श्रेणीतील महिला उमेदवारांसाठी – रु.50
डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI, SBI चालान द्वारे फी भरता येते.