अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांना आपल्या कामाचा मोबदला दिला जात आहे. त्यामुळे त्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पारा पाडून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी.
यापुढील काळात प्रत्येकाने व्यवस्थित काम करावे, अन्यथा कागदावर घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल, वेळ पडल्यास निलंबित केले जाईल.असा इशारा उपमहापौर गणेश भोसले यांनी दिला.
नुकत्याच झालेल्या एका बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सर्वांनी कामकाजात सुधारणा करून महापालिककेच्या कारभारात शिस्त लागेल असे काम करावे.नगर शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत.
पूर्वी कचरा उचलल्यानंतर प्रत्येक प्रभागाप्रमाणे निर्जंतुकीकरण पावडर मारली जात होती, आत ती मारली जात नाही त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच चिकन,मटनचे वेस्टेज रस्त्याच्या तसेच ओढ्या नाल्याच्या बाजूला फेकले जाते,त्यामुळे कुत्र्यांचा मोठा उपद्रव वाढला आहे.
याबाबत उपाययोजना कराव्यात. पावसाळा सुरू झाला आहे शहरातील काही भागात नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी घुसते , त्यामुळे नागरिकांच्या आर्थिक प्रश्नांबरोबरच आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.
याचबरोबर साथीचे रोगही सुरू होत आहे यासाठी उपाययोजना कराव्यात. घनकचरा विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याने गणवेषात ओळखपत्रासह कामावर यावे. सध्या नगर शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी असली तरी थोड्याप्रमाणात वाढत चालली आहे.
तरी महापालिका आरोग्य विभागाने या कोरोना रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी करून घ्यावी जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, शहरातील कोरोनाची रुग्ण संख्या शून्य कशी होईल या मध्ये लक्ष केंद्रित करावे.
तिसऱ्या लाटेच्य पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी महापालिकेने उपाययोजना कराव्यात असेही ते म्हणाले.