फडणवीस हे दुसरीकडे कुठंही बोलले असते तर ते खपून गेले असते. महाराष्ट्र हे खोटं लपून राहणार नाही !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- पेट्रोल व डिझेल दरवाढीनंतर केंद्र सरकारवर महाविकास आघाडी सरकारने जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने राज्यात तीव्र आंदोलन सुरु केले आहे.

तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडूनही टीका करण्यात आली आहे. या टीकेला भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना राज्य सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढीला राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका केली होती. याला आता राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस हे दुसरीकडे कुठंही बोलले असते तर ते खपून गेले असते.

महाराष्ट्र हे खोटं लपून राहणार नाही, अशी बोचरी टीका करत समाज माध्यमावर व्हिडिओच शेअर केला आहे. ते पुढे म्हणाले, केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोल वरील करात राज्याला किती पैसे मिळतात? तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या

32.90 रुपयांपैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण ( देवेंद्र फडणवीस) मात्र राज्याला 12 रुपये मिळत असल्याचे सांगतात, हे सगळे खोटे आहे.

विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी 12 रुपये दिसत असतील तर याला काय म्हणावं? सगळीकडं अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही.

दिवसाढवळ्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असे धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही, असो टोला रोहित पवार यांनी हाणला.

अहमदनगर लाईव्ह 24