अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- संकटाचा सामना करायचा का संकटाला भिऊन घरात बसायचं ? म्हणजे चुकीचं वागा असा याचा अर्थ नाही.
मुख्यमंत्री पदोपदी सांगतात मास्क वापरा, हात धुवा, सामाजिक अंतर पाळा. मुख्यमंत्र्यांच्या सुचना पाळायला का अडचण आहे आपल्याला ? नाही ? प्रशासनाच्या मागे अधिक मजबुतपणे उभे राहिले असता तर काही जिव नक्कीच वाचले असते.
मी तपशिलात जाणार नाही. त्यासाठी योग्य वेळ येऊ द्या. मी आमदार असतो तर ५० टक्के जिव नक्कीच वाचविले असते असा दावा करीत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मा. आ. विजय औटी यांनी आमदार नीलेश लंके यांच्यावर पुन्हा निशाणा साधला.
मावळेवाडी येथील ३ कोटी ७९ लाख रूपये खर्चाच्या रस्त्याचे औटी यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मा. आ. औटी पुढे म्हणाले, आपण कशाचं समर्थन करतो आहोत हे सुद्धा समजू नये ? म्हणून कधी कधी मनामध्ये चिड येते.
वेदना होतात, त्रास होतो. जे काही चाललंय ते काही योग्य चाललं नाही. अनेक आमदार मला फोन करून सांगतात. तुमचा विश्वास बसणार नाही अशा गोष्टी आहेत. म्हणून असं वाटतं कसं ऐवढं झाल ? ठीक आहे, १८, २०, २२ वर्षांची पोरं बिघडली.
‘ते’ बरं आहे म्हणाले. आजच्या परिस्थितीचा आढावा घ्या, बारकाईने, शांतपणे, त्रयस्तपणे घ्या. चुकलंय असं मान्य करायला लागलेत लोक. आता वेळ निघून गेली आहे. आपण आपल्या मतदारसंघापुरतं बोलतो.पुढचं आपल्याला माहीती नाही.
त्यांना त्यांच चालू ठेवायचंय बिघडवायचंय, मोडायचंय, तोडायचंय का पाडायचंय काय आपल्याला माहीती आहे ? वरच्यांच काय व्हायचं असेल ते होईल. हे सारं दुरूस्त करायचं असेल
तर भविष्य डोळयापुढे ठेऊन येणा-या जि. प., पं. स., नगरपंचायत निवडणूका जिंकायच्या असतील सत्तेचा बॅलन्स साधावा लागेल. ८०, ८२ हजार लोकांनी मला मतदान केलं. त्यांना जि.प. व पंचायत समितीमध्ये दोन दारं कुठेेतरी मी तयार करून दिल्याचे ते म्हणाले.