जर शेतकऱ्यांकडून जास्त पैसे घेतले तर कारवाई अटळ..! उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांचा इशारा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- खतांच्या गोण्यांवर जी छापील किंमत आहे.त्याच किमतीत ती खते विका. जर या किमतीपेक्षा जास्त किमतीने खते विकल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल.

शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते, औषधे खरेदीची पावती विक्रेत्यांकडून अवश्य घ्यावी,गरजेप्रमाणे खरेदी करावी. विक्रेत्यांनी त्यांच्याकडे असलेल्या मालाचा साठा व दर दुकानाच्या दर्शनी भागात लावावेत.

अशा सुचना उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी दिल्या. कापसे यांनी कृषी सेवा केंद्रांची पाहणी केली,यावेळी त्यांनी विविध सूचना केल्या.

ते म्हणाले की, कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर स्वत: दुकानदाराने व खरेदीदाराने मास्क लावावा, विक्री केंद्रात सॅनिटायझर उपलब्ध करून देत त्याचा स्वत:, तसेच खरेदीदाराने वापर करावा,

सुरक्षित अंतराचे पालन करावे, केंद्रासमोर गर्दी होणार नाही. यासाठी उपाययोजना कराव्यात, सुरक्षित अंतर राहण्यासाठी मार्किंग करणे आवश्यक आहेत.

वरील बाबींचे पालन होत नसल्यास जिल्ह्यातील निरीक्षकांकडून अचानक भेटी देऊन कारवाई केली जाईल. खतांच्या गोण्यांवर छापील किंमतीपेक्षा जास्त किमतीने खते विकल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल.

शेतकरी गटामार्फत एकत्रित निविष्ठांची मागणी ऑनलाईन पद्धतीने नोंदवून निविष्टा बांधावर पोहोच करण्याबाबत कृषी सेवा केंद्रचालकांनी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24