अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- आज पडळकरांनी अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला, तर ते अधिवेशन संपायच्या आत 4 दिवसांत राज्यच विकून मोकळे होतील, अशी टीका केलीय.
यामुळे राजकीय ठिणग्या अजून बऱ्याच पडण्याची चिन्हे आहेत. गोपीचंद पडळकर आणि पवार यांचे सख्य उभ्या महाराष्ट्राला माहितय.
आता अधिवेशन सुरू असताना पवारांवर टीका करण्याची संधी सोडणारे पडळकर कसले. त्यांनी अजित दादांवर शरसंधान साधले. ते म्हणाले, अजित पवारांना जर मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला, तर हे अधिवेशन संपायच्या आत चार दिवसांत ते राज्यच विकून मोकळं होतील.
शिवाय सध्या सुरू असलेल्या परीक्षा घोटाळ्यांवरूनही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. पडळकर म्हणाले, राज्यात विद्यार्थी फक्त भाजपचेच आहेत का? प्रत्येक ठिकाणी लाखोंचे आकडे येत आहेत.
हे प्रकरण थेट मंत्रालयापर्यंत पोचतंय. हे सारं सरकारच्या आशीर्वादानं होतंय, असा आरोपही त्यांनी केला. या घोटाळ्यात तुमचेच एवढी लोक यात सामील असतील,
तर पोलीस चौकशी कशी करणार, असा सवाल करत सीबीआय चौकशीची मागणी केली. सीबीआय चौकशी केली, तर बिघडलं कुठं, तुम्ही काही केलं नाही, तर भीती कसली, करू द्या ना सीबीआय चौकशी, अशी मागणीही त्यांनी केली.