अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- नेवासे तालुक्यातील चांदा येथील ज्ञानदेव दहातोंडे यांची ४ जून रोजी रात्री ९.३० हत्या करण्यात आली.
या घटनेचा तपास सोनईचे पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र कपॅ यांच्या कडे दिला मात्र या तपासात प्रगती होत नसल्याचे सांगून दोन दिवसांत आरोपींना अटक न झाल्यास चांदा बसस्थानकावर रस्ता रोको करण्याचा इशारा उपसंरपच चांगदेव दहातोंडे यांनी दिला आहे.
चांदा येथील ज्ञानदेव सोपान दहातोंडे यांची चांदा येथील भरचौकात दोन मारेकऱ्यांनी मोटार सायकल वर येऊन हत्या करण्यात आली.
यामुळे चांदा व परिसरात दहशत पसरली होती या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपनिरीक्षक सुदर्शन मुंढे यांनी घटनास्थळी धाव घेऊन रकतेचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवले परंतु सोनई पोलीसांना गेल्या १५-२० दिवसात गुन्हेगारांना अटक करण्यात यश मिळाले नाही.
सोनई पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र कपॅ यांना तपास करुन आरोपींना अटक करावी यासाठी अनेक वेळा भेट घेतल्याचे सांगुन चांगदेव दहातोंडे यांना सोनई पोलीसाकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन एकच उत्तर दिले जाते की, तपास चालू आहे.
असा तपास आणखी किती दिवस चालणार आहे. तेव्हा हा तपास तातडीने करून सदर घटनेतील आरोप यांना दोन तीन दिवसात अटक होण्यासाठी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना भेटून निवेदन देणार असल्याचे सांगितले.
तसेच जर जलद कार्यवाही न झाल्यास चांदा बसस्थानकावर गावकऱ्यांसहित रस्ता रोखो आंदोलन केले जाईल. यासाठी वेगळे निवेदन दिले जाणार नसल्याचे उपसंरपच चांगदेव दहातोंडे यांनी सांगितले.