अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा काहीसा कहर कमी झाला आहे. यामुळे जिल्हा अनलॉक करण्यात आला.
मात्र त्यानंतर गर्दी उसळू लागल्याने पुन्हा काही ठिकाणी 2 दिवसांचा जनता कर्फ्यू तसेच वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. याच मुद्द्यावरून पाथर्डीकरांनी चांगलाच आक्रमकपणा स्वीकारला.
बाजारपेठेतील गर्दी आळा घालण्यासाठी आज पालिका सभागृहात नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्यापार्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी व्यापार्यांनी विविध अडचणी मांडल्या.
पालिका प्रशासनाला व्यापार्यांच्या प्रश्नाबाबत गांभीर्य नसेल तर बैठका कशासाठी असे यावेळी व्यापारी म्हणाले.
त्यात पालिकेने व्यापार्यांना सुविधा द्याव्यात, नंतर बाजार पेठेतील दुकान बंद बाबतची वेळ ठरवावी. व्यापार्यांच्या सूचनांची पालिका प्रशासन दखल घेत नाही.
व्यापार्यांना यापुढे बैठकीसाठी बोलवू नका, असा पवित्रा व्यापारी बांधवांनी घेतला आहे. यावेळी नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, मुख्यधिकारी धनंजय कोळेकर, नगरसेवक रमेश गोरे,
बजरंग घोडके, महेश बोरुडे, नामदेव लबडे, नगरसेविका मंगल कोकाटे, विरोधी पक्ष नेते बंडू बोरुडे, अनिल बोरुडे, रमेश हंडाळ, बबन बुचकुल, संजय डोमकावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.