ताज्या बातम्या

सरकारला सत्‍तेचा माज, 50 हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही तर…

Published by
Ahmednagarlive24 Office

चंद्रपूर : भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार टीका केली आहे. अर्थसंकल्पात सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) ५० हजार अधिक देऊ अशी घोषणा केली होती मात्र अजूनही ते पैसे खात्यात आपले नसल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महाराष्‍ट्रात (Maharashtra) 1.37 कोटी शेतकरी आहेत. त्‍यातील 1.06 कोटी गरीब शेतकरी आहेत. 6 मार्च 2020 रोजी विधानसभेत सरकारने सांगितले होते. नियमित कर्ज भरणाऱ्यांच्‍या खात्‍यात आम्‍ही 50 हजार रूपये जमा करू, ही घोषणा पूर्ण झाली नाही.

आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्‍यात आली. पुन्‍हा 8 मार्च 2021 रोजी तीच घोषणा केली. पुन्‍हा एकदा सरकार (Government) खोटे बोलले. 11 मार्च 2022 रोजी पुन्‍हा घोषणा केली. अजुनपर्यंत शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात 50 पैसे सुध्‍दा जमा झाले नाही.

हा जनआक्रोश (Mass outrage) त्‍या शेतकऱ्यांसाठी आहे. पुढील महिन्‍याभरात जर सरकारने 50 हजार रूपये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात टाकले नाही तर हा जनआक्रोश अधिक तिव्र होईल, असा ईशारा सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, आज चंद्रपूर जिल्‍हयातील 15 तालुक्‍यातील कार्यकर्ते कडक उन्‍हात एकत्र येवून सरकारला प्रश्‍न विचारायला व उत्‍तर मागायला आले आहे. चंद्रपूर जिल्‍ह्यात कोळसा खाणी, औष्‍णीक विज निर्मीती केंद्र आहे.

आम्‍ही प्रदूषण सहन करतो आणि हे सरकार आमच्‍या जिल्‍ह्यात लोडशेडींग करते. हे अजिबात चालणार नाही. शेतकऱ्यांना पाणी दिले नाही तर पीक नष्‍ट होईल. आजही भारनियमन सुरू आहे हे अधिकाऱ्यांनी स्‍पष्‍ट केले आहे. माझा अधिकाऱ्यांविरूध्‍द रोष नाही, सरकारविरूध्‍द हा एल्‍गार आहे.

धानाचा बोनस शेतकऱ्यांना मिळालेला नाही. अंत्‍योदय व बीपीएल कार्डधारकांना त्‍वरीत धान्‍य उपलब्‍ध करण्‍याची आवश्‍यकता आहे. शेतकऱ्यांच्‍या कृषीपंपांना त्‍वरीत विजेचे कनेक्‍शन देण्‍याची आवश्‍यकता आहे.

वन्‍यप्राण्‍यांमुळे झालेल्‍या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना तातडीने देण्‍याची आवश्‍यकता आहे. तसेच मानव व वन्‍यजीव संघर्ष रोखण्‍यासाठी उपाययोजजना करण्‍याची गरज आहे. चंद्रपूर महानगरात नझूल निवासी घर धारकांना मालकी पट्टे देण्‍यात आलेले नाही.

त्‍याचप्रमाणे आदिवासी व गैरआदिवासी बांधवांना वनजमिनीवरील अतिक्रमणाचे स्‍थायी पट्टे त्‍वरीत देण्‍याची आवश्‍यकता आहे. यासर्व मागण्‍यांसाठी हा जनआक्रोश आहे. या जनआक्रोश आंदोलनाची तातडीने शासनाने दखल न घेतल्‍यास हे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

माजी आमदार अतुल देशकर यांनीही आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, सर्वसामान्‍य जनतेच्‍या तसेच शेतकऱ्यांच्‍या व्‍यथावेदनांशी या सरकारला काहीही देणेघेणे नाही.

प्रामुख्‍याने धान उत्‍पादक शेतकऱ्यांची उपेक्षा हे सरकार करीत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे हाल होत आहे. या सरकारला सत्‍तेचा माज आला आहे. या सरकारला वठणीवर आणण्‍याची गरज असल्याचे अतुल देशकर यांनी सांगितले आहे.

Ahmednagarlive24 Office